
सावंतवाडी : विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार जीवनाला कलाटणी देतात. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन त्यांच्या अंगी अध्ययनवृत्ती बाणावली, विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास केला तर निश्चितच ते यशाला गवसणी घालू शकतात, असे प्रतिपादन सावंतवाडी येथे राणीसाहेब शुभदा देवी भोसले यांनी केले.
सावंतवाडी शहरातील श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी आणि राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 28 जुलै 2023 रोजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन ह. हा. राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे नियमक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल हे देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड यांन केले. सूत्रसंचालन प्रा. सौ .पी .डी. सावंत यांनी केले. तर
आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले.
दरम्यान, या उद्बोधन वर्गाच्या प्रथम सत्रात कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठाचे प्राध्यापक सचिन श्रवस्थी यांनी मार्गदर्शन केले तर द्वितीय सत्रात प्रा. कोल्हापूर येथील दि एडगे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक सोहन तिवडे यांनी मार्गदर्शन केले. उद्बोधन वर्ग यशस्वीतेसाठी प्रा. अमोल कांबळे, अमोल कांबळे, प्रा. माधव भिसे, प्रा. अनिल गवळी, प्रा. रोहन सावंत, प्रा. रवींद्र सावंत, प्रा. मोहन आठवले, प्रा. कल्पना लोबो, प्रा. माधुरी ठाणेकर, प्रा. सबिना डिसोझा, प्रा. श्वेता केदार, प्रा. श्रीकांत खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.