स्त्रीरोगतज्ञ डॉ.अर्पिता आचरेकर यांचा सेवासमाप्ती कारवाईच्या भितीनं राजीनामा

जिल्हा पत्रकार संघाच्या लढ्याला यश ; जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांची माहिती
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 27, 2023 17:46 PM
views 416  views

सिंधुदुर्गनगरी : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अर्पिता आचरेकर स्त्रीरोगतज्ञ कंत्राटी पध्दतीने सेवा बजावत होत्या. दरम्यान त्यांच्या सेवेबाबत रुग्णांच्या असलेल्या तक्रारीनुसार पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर त्यांना फोनद्वारे धमकी दिली. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन देत डॉ. अर्पिता आचरेकर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार डॉ. आचरेकर यांच्या चौकशीसाठी समिती गटीत करण्यात आली होती. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. डॉ. अर्पिता आचरेकर यांच्यावर झालेल्या चौकशीतुन संभाव्य सेवा समाप्तीच्या कारवाईच्या भितीने त्यांनी 24 डिसेंबरला राजीनामा दिला आहे. पत्रकारांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.

 डॉ. अर्पिता आचरेकर या गेली काही वर्षे कंत्राटी पध्दतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणुन सेवा बजावत होत्या. या काळात रुग्णांच्या कणकवली रुग्णालय अधिक्षकांकडे आलेल्या तक्रारी, बाह्यरुग्ण तपासणीत टाळाटाळ, दाखल रुग्णांबाबत उपचार करण्यास केलेली टाळाटाळ या अनुषंगाने आरोग्य विभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहवाल तयार केला होता. त्यानुसार येत्या काही दिवसांत डॉ. अर्पिता आचरेकर यांच्या सेवा समाप्तीची कारवाई निश्चित होणार होती. ती कारवाई टाळण्याच्या हेतूने त्यांनी स्वतहुन त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पत्रकारांच्या एकजुटीला आणि मागणीला यश मिळाल्याचे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी म्हटले आहे.