वेंगुर्ला एसटी आगार नुतनीकरणाबाबत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या आंदोलनाला यश

Edited by: दिपेश परब
Published on: May 23, 2024 08:44 AM
views 134  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले आगाराचे नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीत व निकृष्ट दर्जाचे काम सुरु होते . त्यावेळी भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  आगार प्रमुखांचे लक्ष वेधून सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची एस्.टी.च्या बांधकाम अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पहाणी केल्याशिवाय काम सुरु करु नये , अशी मागणी केली. या मागणीची एस्.टी.प्रशासनाने दखल घेत सहाय्यक अभियंता अक्षय केकरे व कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांना कामाची पहाणी करण्यास पाठविले . यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांसह संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सुरु असलेले चुकीच्या पद्धतीचे काम तसेच जुन्या असलेल्या लोखंडी छप्पराला काढण्यात आलेला कलर , तसेच सडलेल्या लोखंडाला दिला जाणारा कलरचा मुलामा , तसेच कार्यशाळेच्या ठिकाणी करण्यात येणारे काँक्रिटीकरणाचे काम सुद्धा चुकीच्या पद्धतीत होत असल्याचे निदर्शनास आणून , जो पर्यंत काँक्रिटीकरणाची ऊंची वाढवत नाहीत , तो पर्यंत सदर काम बंद ठेवावे अशी मागणी करीत सुरु असलेले काम बंद पाडले.

या काम बंद आंदोलनाची दखल घेत एस्.टी.प्रशासन नरमले व बुधवार दिनांक २२ मे रोजी सेवा शक्ती संघर्ष कामगार संघला लिखित स्वरूपात संघटनेने मागणी केल्याप्रमाणे काँक्रिटची टाॅप लेव्हलची ऊंची वाढविण्यात येईल असे कळविण्यात आले .त्यामुळे संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असुन कामगार वर्गात विशेषतः कार्यशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

आज वेंगुर्ले आगारातील कार्यशाळेच्या काँक्रिटीकरणाची पहाणी करण्यात आली . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , शशी करंगुटकर , सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाचे सखाराम बाबुराम सावळ ,  साई दाभोलकर ,  रघुनाथ तळवडेकर , दाजी तळवणेकर , प्रमोद  परूळेकर , प्रकाश मोहीते उपस्थित होते.