रत्नागिरीतील 'ती' नौका खलाशासह वाचवण्यास यश...!

Edited by:
Published on: September 27, 2023 17:49 PM
views 84  views

देवगड :  पर्सनेट बोटीचे नटबोल्ट गंजल्यानें त्याला छिद्र पडून पाणी आत शिरू लागल्याने रत्नागिरी बंदरातील पर्सनेट मच्छिमारी नौका कुणकेश्वर नजिकच्या समुद्रात बुडू लागली होती.देवगडमधील मच्छिमार अक्षय हरम आणि त्याचे सहकारी मदतीला धावून बोटीचे इंजिन सुरू करून बोटीसह १५ खलाशांचा जीव वाचविला आहे.ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वा.सुमारास घडली आहे.

रत्नागिरीमधील गजानन माऊली ही पर्सनेट नौका कुणकेश्वर समुद्रात मच्छिमारी करीत असतानाच बोटीच्या समोरील भागातील नटबोल्ट गंजल्याने त्यांच्या होलमधून पाणी बोटीत शिरू लागले.पाणी शिरल्याने तिचे इंजिन बंद पडले व बोट बुडू लागली.याचवेळी त्यांनी देवगडमधील मच्छिमार अक्षय हरम यांना मोबाईलवरून संपर्क केला. त्यांनी आपल्या मालकीची बन्सी ही नौका घेवून तातडीने बुडत असलेल्या गजानन माऊली या बोटीकडे धाव घेतली व सुरूवातील सर्व खलाशी आपल्या नौकेमध्ये घेतले या नंतर अथक परिश्रमाने बंद पडलेले बोटीचे इंजिन सुरू केले व पंपाने पाणी उपसा करीत ही बोट देवगड बंदरात आणण्यात यश आले आहे.