जिल्हा बँकेत कार्यरत असणारे सुबोध कुडतरकर यांचं निधन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 17, 2024 14:38 PM
views 90  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कणकवली तालुका विकास अधिकारी या पदावर कार्यरत असणारे सुबोध तुकाराम कुडतरकर (रा. करुळ, मधलीवाडी ) यांचे बुधवार, दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अपघाती निधन झाले ते ४९ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. ते हसतमुख व मनमिळावू स्वभावाचे होते. बँकेतील प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जोडलेला आमचा सहकारी अकाली काळाच्या पडद्याआड जाणे हे आम्हा सर्वांना चटका लावून गेले.

त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी शोक व्यक्त केला असून जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात बँकेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ! हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.