सुभानराव भोसले यांच अल्पशा आजाराने निधन !

स्वर्गीय कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानचे सचिव, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष, ग्रामपंचायत माणगावचे माजी सदस्य म्हणून पाहिले काम
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 17, 2022 12:01 PM
views 360  views

सावंतवाडी : स्वर्गीय कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानचे सचिव सुभानराव भोसले (वय ६७, रा. माणगाव तळीकरवाडी) यांच अल्पशा आजाराने आज पहाटे गोवा बांबुळी येथे निधन झाले. स्वर्गीय कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानचे ते सचिव तर माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष, ग्रामपंचायत माणगावचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आज पहाटे अल्पश्या आजाराने त्यांच निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनान भोसले तळीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. स्व.प्रा. मिलिंद भोसले यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.