
सावंतवाडी : कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कारप्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. ६ मध्ये आज १५ जूनला नवोगत मुलांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वितरण माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नवोगत मुलांचे स्वागत केले.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे, उपाध्यक्षा समीक्षा खोचरे, शिक्षणतज्ञ दिलीप भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव सर, सहाय्यक शिक्षिका सायली लांबर, पालक सौ. ईश्वरी तेजम, सौ. तुयेकर, श्री. तेजम, बालवाडी शिक्षिका सौ. दर्शना गावडे, अश्विनी गावडे, दीपा गावडे आदी उपस्थित होते.