तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला बाजाराचा अनुभव...!

Edited by: संदीप देसाई
Published on: August 13, 2023 19:03 PM
views 77  views

बांदा : २०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येते आहे. या वर्षाच्या निमित्ताने जिल्हा परिषद बांदा नंबर १ केंद्रशाळेत विद्यार्थ्यांच्यामध्ये तृणधान्यविषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत  तृणधान्य व कडधान्य , रानभाज्या आदींचे प्रदर्शन मांडणी  व विक्री करून  प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव देखील विद्यार्थ्यांनी घेतला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला या विक्री व प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन झाले. त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर, निलेश मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा वराडकर, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रद्धा नार्वेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रदर्शनात विविध प्रकारची कडधान्य मोड आलेली कडधान्य, गावठी रानभाज्या, ड्रायफ्रूट, गोड पदार्थ, औषधी वनस्पती, फळे, भाज्या याचे‌ प्रदर्शन व वक्री स्टाॅलला शाळेतील पालकांनी भेट देऊन  प्रदर्शनाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी मांडलेल्या वस्तूची खरेदी देखील केली या प्रदर्शनात दहा हजार व अधिक रकमेची उलाढाल झाली. तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने बांदा येथील कृषी अधिकारी रसिका वसकर यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्य व आहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी,जे.डी.पाटील, शांताराम असनकर, रंगनाथ परब, प्रदीप सावंत, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा, मोरे, सपना गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.