विद्यार्थ्यानी मोबाईलपासून रहाव : रेश्मा पाटील

सरस्वती विद्यामंदिर कुडासे प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात
Edited by:
Published on: December 09, 2024 19:06 PM
views 135  views

दोडामार्ग : सर्व विद्यार्थ्यानी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे, खेळाची आवड निर्माण झाली तर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, जिद्द आणि चिकाटी हिच यशाची गुरुकिल्ली आहे. खेळामुळे हार जीत पचवायची ताकद निर्माण होते. खेळात खेळाडूवृत्तीने राहिले पाहिजे, असे मत कुडासे पोलिस पाटील रेश्मा जानू पाटील यांनी व्यक्त केले.

सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुडासे गावच्या पोलिस पाटील रेश्मा जानू पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई, शालेय समिती सदस्य बाबाजी (दादा) देसाई, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनिल गवस, प्रशालेचे मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे,ज्येष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई, एल.के.डांगी, पी.बी.किल्लेदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सागर डेगवेकर, शालेय मुख्यमंत्री आयूष गवस, क्रीडामंत्री विष्णू देसाई, तेजश्री देसाई हे उपस्थित होते या वार्षिक क्रीडा महोत्सावत कबड्डी, व्हाॅलीबाॅल,क्रिकेट,थ्रोबाॅल, धावणे, गोळाफेक, लांबउडी, लंगडी, असे सामने होणार आहेत.

यावेळी दोडामार्ग तालूक्यातील पहिली शालेय राष्ट्रीय खेळाडू, सरस्वती विद्यामंदिर कुडासे प्रशालेचे माजी विद्यार्थ्यानी, मुंबई पोलिस तेजश्री पांडूरंग देसाई हिचा शाल,सन्मानचिन्ह, श्रीफळ,बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधिल प्रशालेचे राष्ट्रीय खेळाडू सुरज देसाई व विष्णू देसाई यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर आभार मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे सर यांनी मानले.