विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरून प्रगती करावी : सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: January 07, 2024 12:55 PM
views 116  views

वेंगुर्ले : भारतामध्ये एकवीसाव्या शतकात अमुलाग्र बदल होत आहे. नविन शैक्षणिक धोरणाचा अवलंब होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरून आपणाला कोणत्या क्षेत्राकडे जायचे आहे त्याचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या जीवनात सुसंस्कृत बनून सुखी व समाधानी जीवन जगावे. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर सातत्याने मुलांसाठी शैक्षणिक काम करते. त्यासाठी त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य  सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

    वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सव २०२४, युवा स्पंदन मधील दुस-या दिवशीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उ‌द्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम यांचे हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी. चौगले, बी.के.सी असोसिएशनचे बाळू खामकर, बेस्ट फ़िजिक मंगेश गावडे, युवा स्पंदन समितीचे चेअरमन प्रा. वामन गावडे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे, प्रा.डी. बी. राणे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.पी. बांदेकर, विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ सचिव फाल्गुनी नार्वेकर, मंथन देसाई, तन्वी तुळसकर उपस्थित होते.

    मी खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. जीवन यशस्वी होण्यासाठी तुमचा शिक्षणातून पाया घडणार आहे. स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन चांगले अधिकारी व्हा. हिच करियर घडवण्याची वेळ आहे. आई वडिलांचे स्वप्न साकार करा. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवा करुन आनंद मिळवा असे प्रतिपादन उमेश येरम यांनी केले. या कार्यक्रमात विविध वेशभूषेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वामन गावडे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी तर कु. फाल्गुनी नार्वेकर हिने उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मंडळ व विद्यार्थी उपस्थित होते.