
वैभववाडी : येथील मातीत अनेक अधिकारी घडले आहेत.विजय साळसकर देखील याच मातीत जन्मले.मुंबईच्या पोलीस खात्यात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अशा कर्तबगार अधिकाऱ्यांचे कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे असं आवाहन आम नितेश राणे यांनी केले.
राज्य शासनाच्यावतीने वैभववाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) एडगांवचे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांचे नाव देण्यात आले आहे.हा नामांतर सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते एडगांव येथे पार पडला. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सरपंच रवीना तांबे, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, दिलीप रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नेहा माईणकर,सुनील रावराणे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, अरविंद रावराणे, रोहन रावराणे, प्राची तावडे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, विनोद रावराणे, स्नेहलता चोरगे, बंड्या मांजरेकर, संजय,सावंत, आयटीचे प्राचार्य नितीन पिंडकुरवार, अमोल राणे, गोपाळ अटक, मनोज प्रभू व पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आम. राणे म्हणाले, जगाला अभिमान वाटेल असे असे कार्य विजय साळसकर यांनी केले आहे. प्रत्येक पिढीने त्यांचे कार्य आत्मसात केले पाहिजे असं मत राणे यांनी व्यक्त केले.तसेच आयटीआय मध्ये नामांतरण फलका शेजारी साळसकर यांच्या कार्याचा माहिती फलक लावा अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या.तसेच आयटीआयच्या प्रलंबित प्रश्नांबाबत योग्य कार्यवाही केली जाईल.महायुतीच सरकार आलं की, सुसज्ज इमारतीसह इतर विषय मार्गी लावले जातील असं आश्वासन आ.राणे यांनी दिले. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, जयेंद्र प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले.