विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी : अॅड. अविनाश माणगावकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 23, 2024 13:51 PM
views 86  views

देवगड : देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.‘ विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रामध्ये उज्वल यश संपादन करावे ‘.असे मार्गदर्शन शाळेच्या स्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या ऍड अविनाश माणगावकर यांनी व्यक्त केले.

प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेमध्ये माध्यमिक शालांत परीक्षेतील 90% आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त एकूण नऊ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यात १) शिवानी प्रशांत मेस्त्री (९७.६०),२) सलोनी संजय मेस्त्री(९६.६०)३) निशा संदेश तोरस्कर (९१.२०)४) आयुष अमोल कोळसमकर (९१.२०)५) तन्मय तेजस राऊत (९०.८०)६) याद्निक का विठ्ठल मल्हार (९०.६०)७) सर्वेश प्रकाश परुळेकर (९०.२०) ८) सोनाक्षी संजय कडू (९०.२०)९) सोहम प्रकाश बोडस (९०.२०) याच परीक्षेत संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील संस्कृत विषयाच्या शिक्षिका पल्लवी पंडित यांच्यामार्फत भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.याचवेळी उच्च माध्यमिक परीक्षेतील शाळेतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये १) श्रुती अजित जोईल (७६.१७)२) कस्तुरी अनिल जोईल (७०.३३) ३) अमिशा महेश घाडी (६८.८३)

प्रमुख पाहुणे शंकर धुरी यांनी शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सर्व घटकांचे अभिनंदन केले. सदानंद पवार यांनी यशाचा हा वारसा असाच पुढे नेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.शाळेचा शंभर टक्के निकाल लागण्यामध्ये शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे विषद केले .मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांपैकी शिवानी मेस्त्री आणि पालक वर्गातून प्रकाश परुळेकर आणि सौ. मेस्त्री मनोगते व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर स्थानीय समिती सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड अविनाश माणगावकर, देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार, संस्थेचे मुख्य चिटणीस शंकर धुरी, मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका निशा दहीबावकर, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सागर कर्णिक यांनी प्रास्ताविक पर्यवेक्षिका निशा दहीबावकर यांनी तर आभार आरती लोके यांनी मानले.