विद्यार्थ्यांनी बौद्धिक श्रम करून कर्तृत्ववान व्हावे. - मनोज गुळेकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 15, 2023 13:59 PM
views 155  views

कणकवली:आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर अर्बन बँकचे सीईओ  शेखरकुमार उत्तम अहिरे  उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर तसेच कार्याध्यक्ष  रघुवीर राणे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी सागर तळेकर, राजेंद्र ब्रह्मदंडे, मोहन कावळे ,परवेज पटेल, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीईओ मिसेस शुक्ला मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक  कौस्तुभ देसाई उपस्थित होते याचबरोबर तळेरे शाखा मॅनेजर नंदकुमार बिरजे ,नाटे शाखा  मॅनेजर रवींद्र बानकर ,पडेल शाखा मॅनेजर संतोष कोळवणकर, अकाउंटंट रमेश काळे, ओएसडी  प्रसन्न मालपेकर उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन  करून ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी लाठी-काठी ,लेझीम ,तसेच समूहगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहीरे सर यांनी विद्यार्थ्यांना आत्तापासून बचत करुन भविष्यासाठी तरतूद करावी असा सल्ला देऊन मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक श्रम करून प्रगती करण्याविषयीचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी महवीश मुल्ला आणि इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी मदिहा सातकूट यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.