
सावंतवाडी : सैनिक स्कूल आंबोलीचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवले आहे.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वीचे विद्यार्थी कॅडेट मृणाल धुरी, कॅडेट रक्षित सावंत, कॅडेट अरींदम पवार, कॅडेट रुद्र शेट्ये, कॅडेट कैवल्य गोसावी यांनी उज्वल यश संपादन करत शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या यशाबद्दल सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, शाळेचे प्राचार्य नितीन गावडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.