
खेड : रविवार दि. ४ मे २०२५ रोजी NTA (नॅशनल टेस्टींग एजन्सी) मार्फत घेण्यात आलेल्या NEET प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या कु. राहिल मुजावर (देशात 2007वा क्रमांक ) व कु. वरद थोरात (देशात 2065 वा क्रमांक ) या विद्यार्थ्यांनी एकूण 720 गुणांपैकी 571गुण ( 99.76 पर्सेनटाईल ) मिळवून रोटरी स्कूलच्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली आहे.
एकूण 720 गुणांच्या NEET प्रवेश परीक्षेमध्ये 15 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एम्स्, केईम, ग्रॅंड मेडिकल, सायन हाॅस्पीटल, बी.जे. मेडिकल, ए. एफ. एम. सी. यांसारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील M.B.B.S. यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या NEET परीक्षेची काठीण्यपातळी खूपच अवघड असल्यामुळे देशभरातील केवळ मोजक्याच 50 ते 60 विद्यार्थ्यांना 650 गुणांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अशा सद्यस्थितीत कोकणातील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली कसब दाखवत NEET परीक्षेत यश संपादन करून देशभरातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण कोकण विभागात NEET या प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून देणारी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल एकमेव शाळा ठरली आहे.
NEET या परीक्षेमध्ये रोटरी शाळेतील कु राहिल मुजावर व कु. वरद थोरात ( 571 गुण, 99.76 पर्सेनटाईल ), कु. स्वरांगी मोरे ( 554 गुण, 99.51पर्सेनटाईल ), कु. सोनम महाले ( 538 गुण, 99.15 पर्सेनटाईल ), कु. मुक्ता गोखले ( 531गुण, 98.83 पर्सेनटाईल ), कु. यश माळी -( 526 गुण, 98.76 पर्सेनटाईल ), कु. सृष्टी भोजने ( 511गुण, 98.15 पर्सेनटाईल ), कु. पियुष घुगरे ( 508गुण, 98.01 पर्सेनटाईल ) विद्यार्थ्यांनी 500 गुणांपेक्षा अधिक गुण तसेच कु. तन्वी जैन हिने ( 498 गुण, 97.51 पर्सेनटाईल ) गुण प्राप्त करून सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशामुळे रोटरी स्कूल व विद्यार्थी यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बायोलाॅजी, फिजिक्स, केमेस्ट्री या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.