नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी श्रीलंकेसाठी रवाना !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 25, 2024 06:47 AM
views 379  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगीवे येथील विद्यार्थी श्रीलंका अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. प्रशालेत घेण्यात आलेल्या गो ग्लोबल या स्पर्धेअंतर्गत शाळेतील इयत्ता दहावीतील महवीश मुल्ला, इयत्ता नववीतील सुजल महातो, इयत्ता आठवीतील झिदान सारंग या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

आज दिनांक 25 एप्रिल रोजी ते  श्रीलंकेच्या अभ्यास दौऱ्यासाठी कणकवलीतील वंदे भारत या ट्रेनने मुंबईला रवाना झाले आहे तेथून ते विमानाने पुढील प्रवासासाठी जाणार आहेत.त्याच्या समवेत शाळेतील  सहाय्यक शिक्षिका श्रद्धा आलते याही आहेत. हा श्रीलंका दौरा ज्यांच्यामुळे आम्हाला घडला ते संस्था अध्यक्ष मनोज गुळेकर व प्रशालेचे संचालक सीईओ नीता शुक्ला यांचे या मुलांनी आभार मानले.

यावेळी रेल्वे स्थानकात मुलांना पुढील प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी शाळेचे सेक्रेटरी मोहन कावळे,मुख्याध्यापिका नीलम डांगे,  तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते