नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला मार्केट डे..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 07, 2023 13:33 PM
views 83  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेच्या विद्यार्थ्यांनी मार्केट डे  चा अनुभव घेतला. दैनंदिन व्यवहार करत असताना बाजारात गेल्यानंतर वस्तू कशा खरेदी कराव्यात. त्यांचे मूल्य कसे ठरवावे. याविषयी माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी मार्केट डे चे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी फळवाले भाजीवाले तसेच दैनंदिन जीवनात ज्या आवश्यक गोष्टी असतात त्यांचे विक्रेते झाले होते. तसेच ग्राहक म्हणून खरेदी करण्याचा अनुभवही घेत होते. या उपक्रमाचे आयोजन के.जी शिक्षिका श्रद्धा आलते, भक्ती पाटील व तृप्ती साटविलकर मॅडम यांनी केले होते. या मार्केटला विशेष उपस्थिती शाळेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी लावली होती. तसेच शाळेच्या सीईओ शुक्ला मॅडम ही यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.