नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 05:42 AM
views 271  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेच्या शैक्षणिक वर्ष 2023 - 24 ची सहल कुडाळ येथे गेली होती. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट देवून ज्ञान संपादित केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी ठाकरवाडी येथील म्युझियम पाहिले तसेच रामायणावर आधारित कटपुतळ्यांचा प्रयोग पाहिला.

यानंतर सरसोली धाम, वसुंधरा विज्ञान केंद्र येथे भेट दिली. वसुंधरा विज्ञान केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानातील  विविध प्रयोग प्रत्यक्ष पाहिले. आकाशगंगेचा अभ्यास केला. तसेच विविध रानभाज्या इ. विषयाचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर हिर्लोक येथील 'मामाचा गाव' येथे भेट दिली. व तेथील फळ संशोधन केंद्रातील विविध बाबींचा बारकाव्याने अभ्यास केला. याबरोबरच मौज मजेचा आनंदही लुटला. ही सहल विद्यार्थ्यांसाठी विविध अनुभवातून ज्ञान देणारी ठरली. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करता आले. या सहलीचे आयोजन नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते.