अभियांत्रिकी महाविद्यालय हरकुळ बुद्रुकच्या विद्यार्थ्यांचं सुयश...!

Edited by:
Published on: March 21, 2024 12:21 PM
views 1560  views

कणकवली : भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS), इस्रो (ISRO) देहरादून आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक या संस्थेची आयआयआरएस (IIRS) आउटरीच नेटवर्कचे नोडल सेंटर म्हणून निवड झाली. संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS), इस्रो (ISRO) देहरादून आयोजित “134 - IIRS Outreach Programme on Exploring Earth's Moon through Chandrayaan” & “135 - IIRS Outreach Programme on Geospatial Analysis using Google Earth Engine” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम १९ ते २३ फेब्रुवारी २०२४ या काळात घेण्यात आला असून त्यासाठी इलेक्ट्रिकल विभागाच्या - कु. कल्पेश विजय दळवी, कु. सौरभ संतोष बिरंबोळे, कु. सिद्धेश विठ्ठल कामत, कु. भक्ती मंगेश माळगावकर, कु. सुमेध सुरेश पाटील, कु. ब्रह्मेश गजानन हळणकर, कु. विवेक राजेंद्र वाडकर, कु. उत्कर्षा धाकू वरक, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या- कु. सेजल लक्ष्मण खरात, कु. धन्विश सदाशिव मोरवेकर, मेकॅनिकल विभागाच्या - कु. मंदार यशवंत धुरी, कु. आशुतोष अनिल कवटकर, कु. आशुतोष प्रविण मोंडे, कु.विजय प्रविण लेले, कु.उझैर अब्दुल्ला शेख, कु.साहिल तानाजी सावंत, कु.गोविंद महेश सावंत, कु.हर्षद निवृत्ती हुले, कु.सुजल सूर्यकांत गावकर आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या- कु.गौतमी सावळाराम गावडे, कु.रिना रवींद्र ठुकरुल, कु.अपर्णा शंभा भैरवकर, कु.साक्षी संदिप लिंगायत, कु.अशोक अरुण हिर्लेकर, कु. यासिरमलिक आसिफ बागवान या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. या कार्यक्रमासाठी प्रा. वैभव विकास माईणकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. 

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक आणि या ऑनलाईन प्रशिक्षण कोर्सचे समन्वयक प्रा. श्री. वैभव विकास माईणकर यांचा भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS), इस्रो (ISRO) देहरादून यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि कोर्सचे समन्वय यांचे संस्थेच्या अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे, प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.