
चिपळूण : येथील सुप्रसिद्ध गोडबोले कोचिंग क्लासेस च्या चोपन्न विद्यार्थ्यांनी आज शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयास भेट दिली. या शैक्षणिक भेटीदरम्यान दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामधील जैवतंत्रज्ञान विभाग, कीटक शास्त्र विभाग, माती परीक्षण प्रयोग शाळा , ग्रंथालय, शेवंती लागवड, झेंडुलागवड ,भाजीपाला लागवड, दुग्ध प्रक्रिया युनिट, बेकरी युनिट, मशरूम्स युनिट, वायनरी ई.प्रकल्पांना भेटी देत सखोल माहीती घेतली. महाविद्यालयाच्या सुमारे ४०० एकर क्षेत्राची सफर करत तेथे चालणाऱ्या या सर्व उपक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कृषि क्षेत्राशी संपर्कच नसलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनात या शैक्षणिक भेटीमुळे प्रचंड कुतूहल निर्माण झाले. महाविद्यालयाचे विविध विभागातील शिक्षक आणि कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तर प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील सर यांनी सर्व मुलांची आपुलकीने विचारपुस आणि स्वागत केले .भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रामध्ये करिअर करण्याची ईच्छा व्यक्त केली.