
दोडामार्ग : पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे चा 50 व्या सुवर्ण महोत्सव ला आज श्री सातेरी केळवाय मंदिरातून दिंडीला सुरुवात करण्यात आली.
मोठ्या उत्साहात गावातील मंडळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा ढोल ताशांच्या गजरात श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पर्यंत पायी दिंडीची सांगता करण्यात आली.
या दिंडीमध्ये ढोल ताशे, लेझिम, दशावतारी वेगवेगळी वेशभूषा करून सर्व विद्यार्थी दिंडीत सामील झाले होते.
त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजेला सुरुवात करण्यात आली.