भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: September 02, 2024 14:37 PM
views 141  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व कौशल्य यावे तसेच शालेय विकासात योगदान देणाऱ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळता याव्यात यासाठी ‘स्टूडेंट कौन्सिल’ निवडून त्यांना पदभार सोपवण्यात आला.

     यामध्ये प्रामुख्याने हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्टस कॅप्टन, कल्चरल सेक्रेटरी, हाऊस कॅप्टन आदी पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, पॉलिटेक्निक उपप्राचार्य गजानन भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हाऊस फ्लॅग व बॅज देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात निवड करण्यात आलेले विद्यार्थी प्राथमिक विभाग हेड गर्ल-मेहरीन शेख, हेड बॉय-अंश धुरी, पृथ्वी हाऊस: कॅप्टन श्रिया सावंत, व्हा.कॅप्टन यश्मित ठाकूर, जल हाऊस: कॅप्टन अविनाश वेंगुर्लेकर, व्हा.कॅप्टन क्रिसॅन पाटील, अग्नी हाऊस: कॅप्टन शुभम देसाई, व्हा.कॅप्टन कृष्णा चौधरी, वायू हाऊस: कॅप्टन विवान सावंत, व्हा.कॅप्टन स्वधा महाजन, माध्यमिक विभाग हेड गर्ल-त्रिशा कुडतरकर, हेड बॉय-भालचंद्र प्रभू वालावलकर, सेक्रेटरी-साहर्ष धुमाळे, जॉईट सेक्रेटरी-अद्विता दळवी, कल्चरल सेक्रेटरी-डेविना फर्नांडिस, जॉईंट सेक्रेटरी-गंधार जोशी, डिसिप्लीन हेड बॉय -खुशाल सावंत, हेडगर्ल -श्रावणी विर्नोडकर, स्पोर्ट्स हेड बॉय - स्वयं गडेकर, हेड गर्ल -लावण्या सुराणा. पृथ्वी हाऊस: कॅप्टन जयेश सावंत, व्हा.कॅप्टन शमी पेडणेकर, जल हाऊस: कॅप्टन पलाश वाडेकर, व्हा.कॅप्टन साची उचगावकर, अग्नी हाऊस: कॅप्टन क्रिस्टीआनो पाटील, व्हा.कॅप्टन मंथन सावंतभोसले, वायू हाऊस: कॅप्टन लेखी म्हानूनकर, व्हा.कॅप्टन राशी हावळ यांंची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ऍड.अस्मिता सावंतभोसले म्हणाल्या की आजचा विद्यार्थी हा उद्याच्या सक्षम भारताचा यशस्वी नागरिक आहे. प्रत्येकाने अभ्यासाबरोबरच नेतृत्व कौशल्य आत्मसात करावे आणि मेहनत व सचोटीने अभ्यास करून स्वतःचा, पालकांचा तसेच शाळेचा नावलौकिक वाढवावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली शेट्टी व प्रीती डोंगरे यांनी केले.आभार प्रदर्शन नेहा म्हाडेश्वर यांनी केले.