एसटी-ट्रॅव्हलरची धडक | बांदा कट्टा कॉर्नर चौकात अपघात

अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 12:00 PM
views 508  views

बांदा : मुंबई -गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर चौकात एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. एसटी बस ही मालवणहून पणजीला जात होती. यावेळी एसटी बस सर्कल न मारता गोव्याच्या दिशेने जातं होती. त्याचवेळी अचानक ट्रॅव्हलर समोर आल्याने हा अपघात झाला. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांनी देखील अपघातस्थळी गर्दी केली होती. याठिकाणी उड्डाणपूल मंजूर असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर काम होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.