
मालवण : शिवसेना इंडिया आघाडीने मालवणात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना शाखेपासून मालवण बाजारपेठेत भव्य मशाल रॅली काढली. आमदार वैभव नाईक, रुचा राऊत यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मालवणात शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मालवण शहरात गुरुवारी सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, रुचा राऊत, पूनम चव्हाण, बाबी जोगी, राजा शंकरदास, दीपा शिंदे, काँग्रेसचे बाळू अंधारी, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बाजारपेठेतून निघालेल्या रॅलीचे फोवकांडा पिंपळ येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी महायुतीवर टिका करत खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला.