कणकवलीत काँग्रेसचा विनायक राऊतांसाठी दमदार प्रचार..!

खा. राऊत यांच्या मताधिक्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कणकवली तालुका बैठक
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 02, 2024 11:11 AM
views 152  views

कणकवली : राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. काँग्रेसचा त्यागाचा, बलिदानाचा विचार आहे. मात्र, मोदी सरकारने अच्छेदिनचे स्वप्न दाखवून देश विकण्याचे काम केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला तर विनायक राऊत यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर काँग्रेसने बिनशर्त पाठींबा जाहिर केला होता, याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आभार मानले.

या बैठकीला श्री. पारकर सुशांत नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अनिल डेगवेकर, नागेश मोर्ये, बाळू मेस्त्री, आबू पटेल, व्ही. के सावंत, प्रदीप वरूणकर, संतोष टक्के, श्रीमती म्हापणकर अजू मोरये,राजु वरने ,महेश तेली, भाई तावडे व इतर उपस्थित होते.

काँग्रेसने या देशाला एक विचार  दिला. मात्र, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारकडून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आले. विरोधक संपवून टाकण्याचे काम शासकीय यंत्रर्णांना हाताशी धरून करण्यात आले. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढविण्यात आली. सर्वसामान्य शेतकरी, गरीबांना जगणे कठिप बनले आहे. म्हणूनच आता परिवर्तन अटळ असून आपण सर्वांनी मिळून ते घडवूया, असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

काँग्रेसचे नेते राहून गांधी यांच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित करून भाजपाने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पदयात्रेनंतर राहून गांधीची प्रतिमा अधिक उजळून आली. आज देशात इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून राहूल गांधीचे नाव घेतले जात आहे. भाजपाने काँग्रेस च गांधी यांना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते संपणार नाहीत. कारण कांग्रेस हा देशाच्या स्वातंत्र्यापासूनचा एक विचारधारा घेऊन जाणारा पश्न आहे. या सर्वाच्या आधाडीच्या माध्यमातुन विनायक राऊत लोकसभा लढवत आपण सर्वांनी मिळून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले. यावेळी प्रदीप मांजरेकर अनिल डेगवेकर, नागेश मोरये, आबू पटेल व इतरांनी मनोगत व्यक्त केली. सुत्रसंचालन व आभार  प्रवीण वरूणकर यांनी मानले.