
सावंतवाडी : नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून प्रभाग ६ मध्ये स्वच्छतेसाठी नगरपरिषद आरोग्य विभाग कटिबद्ध झालेय. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.
ओहोळावर बनलेला मिनी कचरा डेपो स्वच्छ होण्यासाठी बारकाईने लक्ष नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दिले. तसेच रस्त्यावर आलेली वाढलेली झाडी तातडीने साफ केली. जुनाट साचलेला कचरा पूर्णपणे स्वच्छ करुन घेतला. संचयनी परिसरात भरलेल्या गटारमधील गाळ काढला. या स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यासाठी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.












