कणकवली स्टाईल उत्तर 'महासेल' | कणकवलीत व्यापारी महा सेलला ग्राहकांची तुफान गर्दी..!

Edited by:
Published on: August 31, 2023 12:59 PM
views 872  views

कणकवली : कणकवलीत स्थानिक कापड व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या "कणकवली स्टाईल" "उत्तर महासेल" चे उद्घाटन आज जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सेल च्या उद्घाटनानंतर काहीच वेळात आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील व्यापाऱ्यांच्या या सेल द्वारे पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या सेल ला जशास तसे उत्तर या "कणकवली स्टाईल" चे खास कौतुक केले.


या उद्घाटन प्रसंगी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, यांच्यासह नितीन तायशेटे, नितीन वाळके, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, कापड संघटनेचे अध्यक्ष सुरभा गावकर, मंदार वाळके, माधव शिरसाट, उपाध्यक्ष राजु पारकर, बंडू खोत, नंदू उबाळे, दादा कुडतरकर, महेश देसाई, राजेश राजाध्यक्ष, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू गवाणकर, विशाल डांमरी, सूरज रनशूर, प्रसाद डामरी, सुशील परकर, दादा केणी, नंदू आळवे, गीता रनशूर, स्वप्निल पाटील, प्रियांका कोरगावकर, रामू बजाजी, निधा खान, सानिका गावकर, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतील व्यापाऱ्यांनी पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांबरोबर स्पर्धा करत असताना गणेश चतुर्थीच्या तोंडावर स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापाऱ्यांचे कौतुक केले.