
मालवण : कालावल खाडी किनारी वायंगणी हुरासवाडी तसेच वरची तोंडवळी याठिकाणी अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले दगडी रॅम्प महसूल प्रशासनाने तोडून जमीनदोस्त केले आहेत. दरम्यान, याठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन व वाहतूक होत असते असे चौकशीत समोर आले आहे. अशी माहिती मालवण महसूल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाच्या वतीने कर्ली खाडी किनारी केलेल्या पाहणीत वायंगणी हुरासवाडी येथे एक दगडी रॅम्प तर वरची तोंडवळी याठिकाणी दोन दगडी रॅम्प दिसून आले. तीनही रॅम्प तोडण्यात आले आहेत. यापुढे अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक यावर कारवाई अशीच सुरु राहील अशी माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.