
दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोट कालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे . याबाबत तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना वारंवार दुरुस्ती संदर्भात सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र व गोवा यांचा संयुक्त रित्या असलेल्या तिलारी प्रकल्पाला साधारण ३५ वर्षे झाली त्यावेळीच डावा व उजवा अशे दोन कालवे काढण्यात आले .हे कालवे आता पूर्णतः शेवटच्या घटका मोजत आहेत . या कालव्याचे पोट कालव्यांचीही बिकट अवस्था झाली आहे .गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोट कालव्याला गळती लागली काहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे . हा पोट कालवा सासोली, पाटये पुनर्वसन , गोवा आदी भागातील शेतकर्यांना पाणी पुरवठा होतो . सासोली येथे कालव्याला गळती लागल्याने ऐन उन्हाळ्याच्या वेळेत पाहिजे तेवढे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत.
वारंवार फुटणारे कालवे, त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता बिकट अवस्था बनलेल्या कालव्यांची नव्याने दुरुस्ती करा . अन्यथा हे कालवे प्रत्येक दिवशी फुटतच राहणार सासोली येथील पोट कालव्याला लागलेली गळतीची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा त्याच कालव्याखाली उपोषणास बसू असा इशारा सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिला आहे.