माकडांची नसबंदी करण्याची मागणी !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 17, 2023 16:18 PM
views 111  views

सिंधुदुर्ग : माकडांच्या उपद्रवामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून माकडांची नसबंदी करावी. अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष बिग्रे. सुधीर सावंत यांनी आज ओरोस येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ विलास सावंत, अब्दुल शेख, मनवेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.