स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे BDS परीक्षेत यश !

अस्मि सावंतला सुवर्णपदक तर अथांश बांदेकर, गिरिजा चव्हाण, मोहम्मद माज खुनमिर पटेल यांना रौप्यपदक
Edited by:
Published on: April 04, 2023 19:54 PM
views 360  views

सावंतवाडी : BDS ची म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या विकासाला चालना देणारी शिष्यवृत्ती परीक्षा. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता १ ली ते ४ थी च्या एकूण ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले.


त्यापैकी, इयत्ता ४ थी मधील ' अस्मि धीरज सावंत' ( गुण ८४) या विद्यार्थिनीने सुवर्णपदक प्राप्त केले. तर,इयत्ता १ ली मधील अथांश अनंत बांदेकर ( गुण ८५), इयत्ता २ री मधील ' गिरिजा सागर चव्हाण' ( गुण ८४) व इयत्ता ३ री मधील ' मोहम्मद माज खुनमिर पटेल' ( गुण ८६) या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकाविले.


इयत्ता १ ली मधील प्रार्थना प्रणय नाईक ( गुण ८२) व इयत्ता ३ री मधील अनुक्रमे- गौरीश दिपक परब (गुण८) , मनवा प्रसाद साळगावकर (गुण८१) , निधी बाळकृष्ण शिर्के (गुण ७८) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कांस्य पदक पटकाविले. परीक्षेत सहभागी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत तसेच  सौ. प्राची साळगावकर, सौ अमृता सावंत भोसले,  सौ आशा डिसूजा या शिक्षकांकडून वरील शिष्यवृत्ती वर आधारित मार्गदर्शन प्राप्त झाले.


सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक रुजूल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत, शाळेतील सर्व  शिक्षकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या शिक्षणाच्या पुढील वाटचाली करिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.