LIVE UPDATES

प्रवासी संघटनेचा डेपो मॅनेजरांच्या कार्यालयात 5 तास ठिय्या

Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 16:46 PM
views 148  views

सावंतवाडी : एस टी स्थानकाची झालेली दुरावस्था,प्रवाशांचे होणारे हाल या परिस्थितीत जोपर्यंत सुधारणा होत नाही व ठोस आश्वासन मिळत नाही तोवर  हलणार नाही असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी देत  डेपो मॅनेजर नरेंद्र बोधे यांच्या कार्यालयात सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले.

         पाच तासा नंतर उप कार्यकारी अभियंता गिरीजा पाटील या कणकवली हून सावंतवाडीत आल्या व याबाबत येत्या चार दिवसांत उपाय योजना केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या मागणिवर ठाम राहिलेत. शेवटी विभाग नियंत्रकांनी आपण जातीनिशी लक्ष घालून स्थानकाची दुरावस्था सुधारू असे सांगितले. त्यानंतर ठिय्या आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. तर याला सर्व    स्वी जबाबदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर असून येत्या दिवसांत परिस्थिती नाही सुधारली तर केसरकर यांच्या वाढदिनी आंदोलन करू असा इशारा बबन साळगावकर यांनी दिला.

   

यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक विलास जाधव, सिताराम गावडे,बंड्या तोरसकर,रवि जाधव,उमेश खटावकर, सुधीर पराडकर, महेश नार्वेकर,प्रदिप नाईक, दत्तप्रसाद गोठोसकर,प्रदिप ठोरे,संदिप नाईक,प्रसाद म्हाडगूत,भिकाजी राऊळ, सुनिल साईल,उदय भराडी,संतोष घाडी,दिपक सावंत,दिलीप पवार,मनवेल आलमेडा,नियाज सुलेमान,असफान शेख,प्रदिप ढोरे नाना परब आदि उपस्थित होते.