
कुडाळ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आध्यात्मीक सद्गुरू श्री श्री १०८ महंत मठाधीश परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतुन माडयाचीवाडी, खालचीवाडी (कुडाळ) या पुण्यभूमीत कलश पूजन आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. अवघ्या ३ महिन्यात मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून, कृष्णशिला दगडामध्ये श्री स्वामी समर्थांची चैतन्यरुपी मुर्ती साकारली आहे. या सोहळ्यामध्ये अनेक धार्मिक विधी, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रींचा कृपा आशीर्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.
गुरूवार, २७ मार्च २०२५, फाल्गुन कृ. १३ मधुकृष्ण त्रयोदशी, सायं. ४ वा. : उदक शांती गणहोम, रविवार, ३० मार्च २०२५, चैत्र शुद्ध १ गुढीपाडवा, सायं. ४ ते रात्रौ ८ वा. : श्री स्वामी समर्थाच्या मुर्तीची (ढोलपथकासह) भव्य मिरवणूक श्री देव गावडोबा मंदीर ते स्वामी मंदिर माडयाचीवाडी, रात्री ८.३०. वा. : स्वामींच्या मुर्तीचा धान्य अधिवास, सोमवार, ३१ मार्च २०२५, चैत्र शुद्ध २/३, सकाळी ७ वा : स्वामी प्रकट दिन (स्वामी पादुकांवर अभिषेक), सकाळी ८.३० वा. : देवतांना निमंत्रण, स्वस्ती वाचन, सभारदान, जल अधिवास, आचार्य वरण, पिठ देवता स्थापन व पूजन, दुपारी १.३० वा. : महाप्रसाद, सायं. ४ ते सायं. ७ वा. पालखी मिरवणूक सोहळा (ढोलपथकासह) श्री स्वामी समर्थ मठ ते श्री देव गावडोबा मंदिर, मंगळवार, १ एप्रिल २०२५ चैत्र शुद्ध ४, सकाळी ८.३० वा. : आवाहीत देवता पूजन, होम हवन, प्राकार पौष्यण, पर्याय हवन, दुपारी १.३० वा. : महाप्रसाद, साय. ४ वा. : पारंपारीक फुगडी, श्री देवी चामुंडेश्वरी महिला फुगडी ग्रुप, कविलकट्टा (कुडाळ) आम्ही चारचौघी महिला ग्रुप ओरोस, रात्रौ ८ वा. : श्री वावळेवर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा महान पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग अयोध्याधीश श्रीराम, बुधवार, २ एप्रिल २०२५, चैत्र शुद्ध ५ सकाळी ८.३० वा. कलश पूजन व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दुपारी १ वा. : महाआरती व महाप्रसाद, सायं. ६.३० नंतर : सुश्राव्य भजने, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, माडयाचीवाडी, बुवा ऋषिकेश गावडे, पखवाज वादक - लक्ष्मण गावडे, तबला वादक पवन गावडेश्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, बुवा रूपेश यमकर, पखवाज वादक - शुभम गावडे, तबला वादक - अमन सातार्डेकर, भगवती प्रासादिक भजन मंडळ, बाव, बुवा लक्ष्मण नेवाळकर, पखवाज वादक - विराज बावकर, तबला वादक ओंकार राऊळ, गुरुवार, ३ एप्रिल २०२५, चैत्र शुद्ध ५, सकाळी ९ वा. : सामुदायीक अभिषेक, दुपारी १ वा. : महाआरती व महाप्रसाद, सायं ४ वा. : पाककला स्पर्धा (महीलांसाठी), सायं. ६ वा. : गवळीवाडी भजन मंडळ, कारिवडे भजनसम्राट बुवा - मयुर गवळी, रात्रौ ८ वा. : प्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिहर नातू, पुणे यांचे कीर्तन, हार्मोनियमः श्री. स्वप्निल गोरे, तबलाः श्री. किशोर सावंत / पखवाजःश्री. गौरव पिंगुळकर, शुक्रवार, ४ एप्रिल २०२५, चैत्र शुद्ध ७ सकाळी ९ वा. : सामुदायिक अभिषेक, दुपारी १ वा. : महाआरती व महाप्रसाद, सायं. ६.३० वा.: समईनृत्य बहारदार कार्यक्रम पावणादेवी ग्रुप, किंजवडे, देवगड, रात्रौ ८.०० वा. : डबलबारी भजनाचा सामना, श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, भरणी, कुडाळ, संगीत भजनसम्राट बुवा श्री. विनोद चव्हाण, गुरुवर्य - स्व. चिंतामणी बुवा पांचाळ, पखवाज - श्री. तुषार लोट, तबला - श्री. शिवराज पाईपकर, हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे, कुडाळ, संगीत भजनसम्राट बुवा श्री. गुंडू सावंत, गुरुवर्य - स्व. अशोक सावंत बुवा, पखवाज - श्री. विराज बावकर, तबला - श्री. संकेत गोसावी, शनिवार, ५ एप्रिल २०२५, चैत्र शुद्ध ८, सकाळी १० वा. : सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वा. : महाआरती व महाप्रसाद, सायं. ६.३० वा. : स्वरबंदिश प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्ला बुवा अक्षय तांडेल यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ८ वा. : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित नृत्याविष्कार, रविवार, ६ एप्रिल २०२५ चैत्र शुद्ध ९, श्री श्री १०८ महंत मठाधिश परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराजवाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा, सकाळी ११ वा. : औक्षण व संस्थेच्या शुभेच्छा स्विकार, सकाळी ११.३० वा. : सत्कार सोहळा व बक्षीस वितरण, दुपारी १२ वा. : सद्गुरू श्री गावडे काका महाराजांचे मार्गदर्शन, दुपारी १ ते रात्रौ १० वा. पर्यत: सद्गुरू दर्शन व आशीर्वाद सोहळा, दुपारी १.३० वा. : पासुन अखंड महाप्रसाद दुपारी ३ वा. : श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी भक्तीगीत गायन होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सद्गुरु भक्तसेवा न्यास रजि. माडयाचीवाडी धार्मिक आणि सामाजिक संस्था भाविक भक्त परिवार धार्मिक संस्था यांनी केल आहे.