भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर देणार अत्याधुनिक रुग्णवाहिका

Edited by: विनायक गावस
Published on: September 14, 2023 15:23 PM
views 133  views

सावंतवाडी :  राणी जानकीबाई साहेब सुतिकागृह संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला सर्व सोयीने युक्त अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष  अॅड. राहुल नार्वेकर यानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.  तर  येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाला भेट देण्यासाठी  ते सावंतवाडीत येणार असल्याचेही संस्थेचे संचालक उमाकांत वारंग यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्था संचालक उमाकांत वारंग,  यांनी भेट घेतली असता त्यांच्या समवेत डॉ सूर्यकांत राऊळ उपस्थित होते या आयुर्वेद महाविद्यालयाकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.