
कणकवली : स्वेच्छा पुनर्वसन मार्गपणदूर-घोडगे रस्त्याच्या कामाबाबत कळसुली ग्रामस्थांनी लघु पाटबंधारे सिंधुदुर्ग नगरी यांना निवेदन देत दहा दिवसात काम न सुरू झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदार ने घेतलेले काम अर्धवट सोडले आहे. आणि पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता पूर्णपणे वाहतूकीस चालू झालेला नाही. तरी याबाबत आपण कोणती कार्यवाही करणार? किंवा राहिलेला उर्वरी वाहतूक बंद असलेला रस्ता केव्हा मोकळा करणार याबाबत आपणांकडून लेखी खुलासा देण्याचे पत्र आज सिंधुदुर्ग नगरी लघु पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे. तसेच या रस्त्या संदर्भात दहा दिवसात काम करू न झाल्यास ग्रामस्थ करणार पोषण असल्याचा इशारा कळसुळी सरपंच सचिन पारधीये व ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी शैलेश कुमार दळवी, दिगंबर उपस्थित होते