युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन

जिल्ह्याभरातून 7542 विद्यार्थी सहभागी
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 06, 2023 09:59 AM
views 401  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर संपन्न झाली . २री ३री, ४थी, ६वी व ७वी इयत्तांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा भरातून ७५४२ विद्यार्थी सहभागीझाले .

या परीक्षेचे औपचारिक उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्रे – विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे जेष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान, किरण गांवकर, संतोष जाधव, विजय मसुरकर ,केंद्रप्रमुख , टोनी म्हापसेकर, सुहास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. विजय गांवकर यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रात विशेषतः भावी पीडिला योग्य दिशा देण्याचे काम, त्यांच्या पंखात फिनिक्स पक्षाप्रमाणे आत्मविश्वास , ताकत देण्याचे काम संदेश सावंत व सौ संजना सावंत यांच्या माध्यमातून विविध उपक्रमातुन होत आहे . सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित न रहाता संपूर्ण कोकणात घेण्याचा मानस त्यांनी आज झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.संपूर्ण कोकणच्या विद्यार्थ्यांना या अनमोल उपक्रमाच्या माध्यमातून फायदा होईल, अशा भावना मा विजय गांवकर यांनी व्यक्त केल्या. संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी शैक्षणिक उपक्रमातील शिक्षकांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले तसेच सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परिक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत न राहता येत्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी जिल्हात ही परिक्षा सुरू करून लवकरच संपूर्ण कोकणात ही परीक्षा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला..

प्रास्ताविक STS परीक्षा प्रमुख श्री सुशांत मर्गज व सुत्र संचालन श्री राजेश कदम यांनी केले

या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख अडीज लाख रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच ६वी व ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.

यावर्षी उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.

अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज यांच्याशी संपर्क साधण्याचे

आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि माजी जि प अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे .