राज्यस्तरीय 'दीपस्तंभ २०२५' पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2026 16:54 PM
views 13  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय "दिपस्तंभ २०२५" या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीमध्ये दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

                  

मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 रोजी,  आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी, वेल्हे रोड, भोर, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या च्या राज्यव्यापी कार्यक्रमात सतिश मराठे, संचालक- भारतीय रिझर्व्ह बँक व उदय जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्या तथा काका कोयटे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळयाला संस्थेच्या अध्यक्षा श्रीम आनमारी  डिसोजा, संचालिका श्रीम. मार्सेलिन डिसोजा, संचालक. जॉनी फेराव तसेच सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जिस उपस्थित होते.  संस्थेने आजपर्यंत व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात एक विश्वासाचे नाते तयार झाले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत संस्थेच्या सभासद ग्राहक संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे असे अध्याक्षा श्रीम आनमारी जॉन डिसोजा यांनी सांगितले.