वैश्यवाडा सावंतवाडी हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा 12 वा वर्धापन दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2026 16:44 PM
views 19  views

सावंतवाडी : वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा 12 वा वर्धापन दिन गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. 

यानिमित्ताने सकाळी 8 वाजता गणपती पूजन, पुण्याहवाचन व इतर पूजाविधी, सकाळी 9 वाजता परिवार देवता आवाहन, श्री हनुमान सहपरिवार देवतांची महापुजा व हवन, दुपारी 12.30 वाजता पूर्णाहुती, दुपारी 1 वाजता महाआरती व सामुहिक गाऱ्हाणे, दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद व रात्री 8.30 वाजता श्री मूळपुरुष धावडेश्वर भजन मंडळ, वेंगुर्ला यांचे वारकरी भजन असे कार्यक्रम दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहेत.  यावेळी सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.