
सावंतवाडी : एनसीपीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी आज येथील राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्याच्यासोबत साहेबराव कारके, सुनील ढोरे, संजय बावीस्कर उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यात राष्ट्रवादी जोमाने वाढवा लागेल ती ताकद देऊ, असा शब्द शिंदे यांनी श्री दळवी यांना दिला. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवा, जनतेत जात लोकांची कामे करा, राष्ट्रवादी लोकांना आपला पक्ष वाटायला हवा पक्ष आपोआप वाढेल, असा कानमंत्र त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सचिन पाटकर युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस ,आदी उपस्थित होते.