भोसले नॉलेज सिटीतील राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: विनायक गावस
Published on: October 05, 2023 13:36 PM
views 104  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मेकॅनिकल विभागामार्फत गांधी जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयातून एकूण 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला.     

यात गीता तटकरे पॉलिटेक्निक, कोलाड येथील वेद हेमंत भोईर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक व रु.1500 रुपयाचे रोख पारितोषिक पटकावले. पुणे येथील पिंपरी चिंचवड महाविद्यालयाच्या सौरभ रुपनवर याने द्वितीय तर यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील क्षितिज भुसण्णावर या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.   

मेकॅनिकल विभागाचे प्रा.अमृत यादव यांनी यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.अभिजीत राणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.