
सावंतवाडी : सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी इंगळी, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय, इंगळे यांच्या माध्यमातून दिला जातो .यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे मराठी विषयाचे प्रा. संतोष जोईल यांचे वरील क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना यावर्षीचा गुरु श्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळे आयोजित 13व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.त्याचबरोबर काही दिवसापूर्वी त्यांचा काहीच सहन होत नाही हा कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला होता प्राध्यापक संतोष जोईल हे उत्तम सूत्रसंचालक असून तळ कोकणातील साहित्यिक चळवळीत त्यांचा नेहमीच सहभाग असतो.समाज साहित्य प्रतिष्ठानचे ते सदस्य असून त्या संस्थेच्या माध्यमातून देखील साहित्य चळवळ नेहमीच राबवीत असतात .या त्यांच्या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चेअरमन सेक्रेटरी खजिनदार सर्व संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी साहित्यिक वर्ग पालक विद्यार्थी वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.