
सावंतवाडी : ओंकार कलामंच सावंतवाडीच्या डान्स अकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत उद्या १५ मे ला राज्यस्तरीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे.
ही स्पर्धा ग्रुप आणि सोलो डान्स अशी दोन विभागांमध्ये घेण्यात येणार असून ग्रुप साठी प्रथम पारितोषिक 10000 द्वितीय 5000 तर तृतीय पारितोषिक 3000 ठेवण्यात आले आहेत सुरु डान्स पद्धती प्रथम 5000 द्वितीय 3000 आणि तृतीय 2000 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाचा समोर सायंकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे यावेळी डान्स अकॅडमीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नृत्य शिबिरात सहभागी झालेल्या कलाकारांचे नृत्य प्रकार यावेळी सादर करण्यात येणार आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओंकार डान्स अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.