शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ८ जानेवारीला सांगलीत !

अनिल राणे,गजानन नानचे यांनी केले उपस्थितीचे आवाहन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: December 26, 2022 16:08 PM
views 180  views

सावंतवाडी : माध्यमिक , शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ८ जानेवारीला सांगली येथे होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे यांनी केले आहे.

शिक्षकेतर संघटन महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र कर्नाळा रोड सांगली येथे ८ जानेवारीला आयोजित केले आहे.  शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून खुले अधिवेशन व ठराव पारित होणार आहेत. अधिवेशनास अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जयंतराव पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम काळे, आमदार सुधीर तांबे, आमदार कपिल पाटील, आमदार जयंत आसवकर, आमदार अरुण लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार किसनराव सरनाईक, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार विक्रम सावंत, आमदार शहाजीबापू पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली बँक संचालक प्रकाश जमदाडे, विजय बोरसे, गुलाबसिंग कदम, मोहन जोथे, राजेसाहेब लोंढे, महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, उपाध्यक्ष श्रीशैल तलवार, उपाध्यक्ष शोभा तांबे, उपाध्यक्ष मंगला भंडारवार, उपाध्यक्ष खैरुद्दीन सय्यद आदी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशन एक दिवसाचे आहे. तरी सदर जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे यांनी केले आहे.