राज्यस्तरीय ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार सैनिक पतसंस्थेला प्रदान

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन मुंबई यांच्याकडून गौरव!
Edited by: विनायक गांवस
Published on: November 02, 2022 19:22 PM
views 316  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पनवेल-मुंबई येथे राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

१९९१ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या या संस्थेने ३६,००० रुपयांपासून १५० कोटीपर्यंत ठेवी गोळा करण्यापर्यंत देदीप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने व्हिजन २०२५ कार्यक्रमाअंतर्गत २०० कोटी ठेवी गोळा करण्याचा संकल्प सोडला असून त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल अगदी जलद गतीने सुरू आहे. 

संस्थेच्या संचालक मंडळाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला सक्षम व्हावी व तिने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, यासाठी महिला सबलीकरण व सक्षमीकरण या योजनेअंतर्गत महिलांना हिरकणी कर्ज योजनेद्वारे कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिकस्त्रोताचे एक हक्काचे दालन सुरू करून दिलेले आहे. या योजनेस सुरुवातीपासूनच प्रचंड प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणात महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे.

संस्था देत असलेल्या विविध ठेवीवर आकर्षक व्याजदर रौप्य धनलक्ष्मी बॉण्ड योजनेवर हमखास मिळणारी लकी ड्रॉद्वारे बक्षिसे. यामुळे जिल्ह्यातील ग्राहक संस्थेला पहिली पसंती देत आहेत. संस्था दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असून संस्थेने चित्रकला, वक्तृत्व व ट्रिकसिनयुक्त दशावतार स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्यावसायिक मार्गदर्शन सवेश नाट्य स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबविल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हातभार लावण्याचे काम संस्था करीत आहे.

संस्थेच्या संचालकांनी घेतलेल्या भविष्यकालीन धोरणी निर्णयामुळे व कर्मचारी देत असलेल्या योगदानामुळे उत्कृष्ट व्यवस्थापन राष्ट्रीयीकृत बँकांच्या तोडीला देण्यात येणाऱ्या विविध योजनांची होत असलेली प्रभावीपणे अंमलबजावणी यामुळे संस्थेचा आलेख सतत चढता राहत आहे. संस्थेने जिल्ह्यात स्वतःची पत निर्माण केली असून जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सहकार्याच्या जोरावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. संस्थेकडून सोनेतारण कर्ज योजनेतून कर्ज घेणाऱ्या सभासदाच्या कर्ज रकमेवर आकर्षक भेटवस्तूही मिळू शकतात. यासाठी ५००० रुपयांपेक्षा कर्ज रकमेची उचल होणे आवश्यक आहे.