ALERT | राज्य महामार्गावर वटवृक्ष पडल्याने वाहतूक ठप्प

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 07, 2023 12:28 PM
views 269  views

कणकवली : जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस सुरू असलेल्या सतत पावसामुळे कणकवली तालुक्यातील  देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथे नांदगाव तिठ्ठाच्या काही अंतरावर जुनाट महाकाय वटवृक्ष शुक्रवार सकाळी १०:३० च्या सुमारास उन्मळून पडला. त्यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. वीज पुरवठाही खंडित झाला आहे.


 घटनेदरम्यान काही शाळकरी मुले व नागरीक रस्त्यावरून जात असताना हा वटवृक्ष कोसळला, मात्र दैव्य बलवत्तर म्हणून कोणतीही ईजा कुणाला झाली नाही. त्याचबरोबर वटवृक्षा शेजारी विद्युत प्रवाहित तारा व पोल असल्याने त्याचेही नुकसान झाले. यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला आहे.


दरम्यान स्थानिकांकडून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. वटवृक्ष रस्‍त्‍यावरून हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा  झाला आहे.