
वैभववाडी : नाधवडे येथील बंड्या मांजरेकर मित्र मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे संगमेश्वर येथील सुरज सुरेश चव्हाण यांच्या बैलगाडीने प्रथम तर कोल्हापूर शाहूवाडी येथील श्रावणी सचिन सावंत यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळविला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
नाधवडे महादेव मंदिरानजीक माळरानावर बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे सकाळी आम.नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे,माजी जि..प.बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर,नगरसेवक रोहन रावराणे आदी उपस्थित होते.या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील तब्बल ५५ एवढ्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.यामध्ये संगमेश्वर कडवई येथील सुरज चव्हाण यांनी १मिनीट १६.१३ सेकंदमध्ये आपली गाडी पळवली.श्रावणी सावंत यांची१ मिनिट २२.५३सेकंद(द्वितीय),कासार्डे येथील संजय यशवंत जंगम यांची १मिनिट २२.७५सेंकद (तृतीय),करण सुमित बेटकर(रत्नागिरी)१मिनीट २३.४०(चतुर्थ), गजानन मधूकर कुंभार (सावर्डे शाहूवाडी)१मिनीट २४.७५सेंकद या वेळेत गाडी पळवली.त्यानुसार अनुक्रमे प्रथम क्रमांकास ३५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये व चषक चतुर्थ क्रमांक १० हजार रुपये व चषक व पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चालक म्हणून बबन दोरे यांना २ हजार रुपये, उत्कृष्ट बैल जोडी म्हणून प्रतिक मेस्त्री यांच्या बैलगाडीला २ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आला.बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या स्पर्धेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान या स्पर्धेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, यांनी दुपारी भेट दिली. स्पर्धेचे बक्षीस वितरण नाधवडे सरपंच शैलजा पांचाळ, माजी सभापती दिलीप तळेकर, मनोज रावराणे, उद्योजक अवधूत तळेकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे यांच्या उपस्थितीत झाले.