
सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका / नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती जिल्हा शाखा सिंधुदुर्ग,सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या जिव्हाळयाच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हामधील सर्व कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी येथे “ धरणे सत्याग्रह ” सुरू. यामध्ये जिल्हयामधील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महसुल , तलाठी, ग्रामसेवक, कृषी, जि.प.कर्मचारी, भुमि अभिलेख यासह सर्व विभागामधील कर्मचारी सहभागी झाले आहेत .महसुल कर्मचारी संघटना अध्यक्ष व समन्वय समिती सरचिटणीस श्री.सत्यवान माळवे यांनच्या सह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
आठव्या वेतन आयोगाची स्थापना करणेसाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरणे,
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करणे.
PFRDA कायदा रद्द करुन फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधीत राज्य सरकारला परत करणे.
तसेच ईपीएस 95 नुसार सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागु करणे.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करणे.
नवीन 3 क्रिमीनल कायदे रद्द करणेसरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना होणारे भ्याड व हिंसक हल्ल्याविरुध्द कडक कारवाई व्हावी यासाठी पुर्वीचा IPC कलम 353 मध्ये दुरुस्ती करुन कलम 353 अजामीनपात्र करणे.
कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचा-यांच्या सेवा नियमीतकरा यासह इतरही मागण्यासांठी सर्व कर्मचारी शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने या 2 तास “धरणे सत्याग्रह” आंदोलनात सहभागी होवुन आपला रास्त असंतोष व्यक्त करावा. यासाठी कर्मचारी यांचे वतीने निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री.मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले यावेळी श्री.सत्यवान माळवे, महसुल कर्मचारी संघटना अध्यक्ष व समन्वय समिती सरचिटणीस, राजन कोरगावकर अध्यक्ष, रा.स.कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष, श्री.सखाराम सपकाळ, कोकण विभाग सहसचिव, श्री.सचिन माने सहसचिव,श्री.शाम लाखे कोषाध्यक्ष, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत.