राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २.८६ कोटीचा नफा

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 20:20 PM
views 69  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेला ३१ मार्च २०२६ अखेर  आर्थिक वर्षात २ कोटी ८६ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने आजपर्यंत १२५ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आडणेकर यांनी दिली.

ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय  कर्मचाऱ्यांची संस्था असून संस्थेने केवळ ३८ वर्षाच्या कार्यकाळात सर्व सभासदांमध्ये एक आदर्शवत प्रतिमा निर्माण केली आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता संस्थेवर सभासद तसेच नाममात्र सभासदांचा विश्वास असल्यामुळेच आज या संस्थेने १२५ कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे. तसेच सभासद कर्ज १८३ कोटी ९५ लाख रुपये, संस्थेची बँकेतील गुंतवणूक २४ कोटी रुपये असून संस्थेचे खेळते भांडवल २११ कोटी रुपये आहे. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व आदर्श प्रमाण तसेच संस्था पोट नियमानुसार आवश्यक त्या तरतुदी करून संस्था संचालक मंडळाने यशस्वीपणे काम पूर्ण केले आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सभासद, नाममात्र सभासद तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे  संस्थेचे अध्यक्ष कृष्णा उर्फ प्रकाश आडणेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर व सर्व संचालक मंडळाने आभार मानले आहेत.