मोरगावात चव्हाटा मंदिर सभागृहाचा कोनशिला समारंभ उत्साहात

Edited by:
Published on: April 08, 2026 15:39 PM
views 116  views

दोडामार्ग : तालुक्यातील मोरगाव येथे चव्हाटा मंदिर सभागृहाच्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला जिल्हाप्रमुख संजू परब यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोरगाव गावातील मानकरी तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. साशी तळवडेकर, उपसभापती गणेशप्रसाद गवस, सरपंच संतोष आईर, दशरथ ठाकुर, शैलेश ठाकुर, संतोष ठाकुर, रमेश ठाकुर मोरगाव सोसायटी चेअरमन नंदू गावकर, उदय ठाकुर,उपसरपंच आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मंदिर सभागृहाच्या बांधकामाबाबत माहिती देण्यात आली. या सभागृहामुळे गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.