राज्याचे शिक्षण संचालक डॉ. संपत सूर्यवंशी यांची भोसले नॉलेज सिटीला भेट

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची केली पाहणी
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 14:25 PM
views 784  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ.संपत सूर्यवंशी यांनी आज भोसले नॉलेज सिटीला भेट देत येथे सुरु असलेल्या जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाची पाहणी केली. हा प्रशिक्षण वर्ग शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गोथे इन्स्टिट्यूट, पुणे व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आला आहे.

या भेटी दरम्यान डॉ.सूर्यवंशी यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या जर्मन भाषा शिकण्याच्या निर्णयाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले व या पथदर्शी उपक्रमासाठी भोसले नॉलेज सिटीची निवड केल्याबद्दल शिक्षण विभागाचे आभार मानले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी व गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, भोसले नॉलेज सिटीच्या अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले आदी उपस्थित होते.